श्री कानफाटे हनुमान हे जुन्या औरंगाबदेतील एक महत्वाचे मंदिर असून याला सुमारे 100 वर्षांचा इतिहास आहे. जुन्या रॉक्सी टॉकीज जवळ असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून श्री मारुतीची तीन फुट उंचीची बाल मूर्ती दक्षिण दिशेस पाहते आहे. समोर एका हौद वजा खोलगट भागात नंदिसह श्री महादेवाची पिंड आहे. काही जाणत्या मंडळींच्या मता नुसार दर्शनाने काम फत्ते करणारा म्हणून याचे नाव *काम फत्ते* असे असावे परंतु नंतर अपभ्रंश होऊन कानफाटे झाले असावे. मन्दिराचा परिसर शांत, पवित्र व प्रसन्न असून आत बसल्यावर आपण एवढ्या वर्दळीच्या भागात आहोत याची जाणीवही होत नाही. दर्शनाला जरुर जा. जय बजरंगबली....!!!
काही जाणत्या मंडळींच्या मता नुसार दर्शनाने काम फत्ते करणारा म्हणून याचे नाव *काम फत्ते* असे असावे परंतु नंतर अपभ्रंश होऊन कानफाटे झाले असावे.
मन्दिराचा परिसर शांत, पवित्र व प्रसन्न असून आत बसल्यावर आपण एवढ्या वर्दळीच्या भागात आहोत याची जाणीवही होत नाही. दर्शनाला जरुर जा.
जय बजरंगबली....!!!